औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन ग्रहाची इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. सध्या शवविच्छेदनाचे काम पर्यायी जागेत करण्यात येत आहे. मात्र त्या ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली नाही.
घाटी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीवरून, शवविच्छेदनगृहाची इमारत ही जुनी झाली होती. त्यामुळे शेवविच्छेदन करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. तसेच शीतगृहाची देखील दुरावस्था झाली होती. त्यामुळे शीतगृहात शेव ठेवताना अडचणी येत होत्या. मागील वर्षी शासनाकडे शवविच्छेदनाच्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो आता मंजूर झाला आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जुनी इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा चे काम पर्यायी जागेत म्हणजेच मूत्रपिंडविकार विभागात सुरू करण्यात आले आहे. तेथे मात्र शव शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली नाही. ती लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी अनोळखी शव हे तात्काळ शवविच्छेदन करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सूचनाही पोलीस विभागाला करण्यात आल्याची माहिती घाटी रुग्णालयाकडून मिळाली आहे. नवीन इमारतीत मात्र सर्व सोयी सुविधा मिळणार आहेत. तेही कमीत कमी कालावधीत उभी राहणार आहे. असे घाटी रुग्णालय विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.